🚨६३ गुंडांना यमसदनी धाडणारे सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे पुन्हा सेवेत दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 7, 2020

🚨६३ गुंडांना यमसदनी धाडणारे सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे पुन्हा सेवेत दाखल..

घाटकोपर स्फोटांमधील संशयित आरोपी ख्वाजा युनूस याच्या मृत्यूप्रकरणी निलंबित झालेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. वाझे यांच्यासह १८ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामील करण्यात आले आहे. त्यांच्यात ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित झालेल्या चार पोलिसांचा समावेश आहे. त्यातील तीन पोलिसांचे निलंबन पोलिस संचालक कार्यालयामार्फत करण्यात आले होते. वाझे यांची सशस्त्र पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली आहे.

मूंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.५) झालेल्या पुनर्विलोकन बैठकीत ११३ पोलिसांच्या निलंबनावर चर्चा झाली. त्यापैकी ९५ पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आलेले नाही.

सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची कारकीर्द..
▪️ पोलिस दलात १९९० मध्ये दाखल.
▪️ आत्तापर्यंत ६३ गुंडांना यमसदनी धाडले.
▪️ गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातून सेवेची सुरुवात.
▪️ घाटकोपर येथे २००२ मध्ये झालेल्या स्फोटातील संशयित आरोपी ख्वाजा युनूस याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात निलंबन.
▪️ या प्रकरणी वाझे यांच्यासह १४ पोलिसांवर गुन्हे दाखल.
▪️ ठोस पुरावे न मिळाल्यामुळे वाझे यांच्यासह आणखी तीन पोलिस पुन्हा सेवेत.

पोलिस दलातील मनुष्यबळाचा प्रश्‍न सुटेल..
मुंबई पोलिस दलातील मनुष्यबळ आधीच कमी असून, निलंबित पोलिस घरबसल्या ७५ टक्के पगार घेतात. म्हणून त्यांना सेवेत घेऊन कमी महत्त्वाच्या खात्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्‍न सुटेल व त्यांच्या चौकशीवरही परिणाम होणार नाही, असा पर्याय निवडण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages