👌बिबवेवाडी प्रभागात कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.वर्षाताई भीमराव साठे यांच्यावतीने "आर्सेनिक अल्बम 30" गोळ्या, मास्क, सॅनिटायझर किटचे 450 कुटुंबांना वाटप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, June 8, 2020

👌बिबवेवाडी प्रभागात कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.वर्षाताई भीमराव साठे यांच्यावतीने "आर्सेनिक अल्बम 30" गोळ्या, मास्क, सॅनिटायझर किटचे 450 कुटुंबांना वाटप..

कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. अद्यापही कोरोनाला रोखण्यासाठी औषध सापडलेले नाही. मानवी शरीरातील प्रतिकारशक्तीच कोरोनाला लांब ठेवू शकते त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करिता रवीवार दि.7 जून रोजी बिबवेवाडी प्रभाग क्रमांक 37 च्या कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.वर्षाताई भीमराव साठे यांच्यावतीने प्रभागांमध्ये श्री.भिमराव बबन साठे यांनी स्वतः उपस्थित राहून चिंतामणी भाग एक आणि दोन तसेच प्रसन्न सोसायटी, उमाशंकर सोसायटी, अप्पर बस डेपो येथील शिवनेरी रिक्षा स्टॅन्ड संघटनेच्या रिक्षाचालक व सुमारे 450 कुटुंबांना डॉक्टर श्री.सुनील उचेला, कार्यकर्ते श्री.मिननाथ परांडकर, श्री.सचिन पाटोळे, श्री.दत्ता गायकवाड, श्री.पांचाळ, श्री.निखिल भालेकर, श्री.ओंकार धामस्कर, श्री.गिरीश क्षीरसागर, श्री.अशोक शिंगे, श्री.गणेश अर्जुने इत्यादी कार्यकर्त्यांच्या सहकार्यने होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझर किटचे मोफत वाटप पर्वती मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री.जितेंद्र पोळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बिबवेवाडी प्रभाग क्रमांक 37 च्या कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.वर्षाताई भीमराव साठे यांच्या पुढाकारात श्री.भिमराव बबन साठे यांनी विभागातील प्रभाग क्र.37 मध्ये राहणारे गोरगरीब नागरिकांना या औषधाची माहिती देत होमिओपॅथिक “अर्सेनिक अल्बम-३०” या गोळ्याचे वाटप करण्यात आले. या गोळ्या वाटप करतेवेळी सोशल डिस्टेंसिंगची विशेष काळजी घेण्यात आली असुन याचा लाभ परिसरातील संपूर्ण नागरिक घेत आहेत.
त्याचबरोबर श्री.भिमराव बबन साठे यांनी या गोळ्या कश्याप्रकारे घ्यायचे याची माहिती देत :-
1) सलग तीन दिवस सकाळी उपाशीपोटी दिवसातुन एकदा 3 गोळ्या घ्याव्यात.
2) गोळ्या झाकणात काढून जिभेवर ठेवाव्या हात लाउ नये.
3) गोळ्या पाण्यासोबत घेऊ नये.
4) गोळ्या घेण्या अगोदर किवा घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिटे काहीही खाऊ पिऊ नये.
5) या गोळ्यांच्या डोस पुन्हा एकदा 1 महिन्यानंतर 3 दिवस घेण्यात यावा तसेच ह्या औषधामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ति वाढते व कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होतो.
कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या देशात वाढीस लागल्याने आयुष मंत्रालयाने “अर्सेनिक अल्बम-३०” या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. या होमियोपॅथिक औषधाचा कोणताही साइट इफेक्ट होत नसल्याचे श्री.भिमराव बबन साठे ह्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच बिबवेवाडी प्रभाग क्रमांक 37 च्या कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.वर्षाताई भीमराव साठे ह्यांच्याकडून प्रभागात विविध उपक्रम राबविण्यात येते. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
यावेळी, चिंतामणी भाग एक आणि दोन ह्या भागातील सामाजिक कार्यकर्ते. चेअरमन श्री.धीरेंद्र देशपांडे, व्हाईस चेअरमन श्री.रमेश किस्ते, सिक्युरिटी इन्चार्ज श्री.श्रीकांत टाकळकर, सौ.म्हालंक ताई, श्री.रोहिदास शिरस, श्री.सुनील जाधव, श्री.राम भाऊ शिंदे, श्री.पंकज डांगे, श्री.टाकळकर साहेब, श्री.फडके काका, श्री.विजय मकाशीर, श्री.सर्जेराव कवडे, श्री.विनायक जाधव, श्री.शिवदास तांबे तसेच उमाशंकर सोसायटी आणि प्रसन्न सोसायटी येथील सामाजिक कार्यकर्ते सौ.हर्षदाताई वाणी, सौ.अनिता पाटील, सौ.सुचित्रा जाधव, सौ.मंजिरी शहा, सौ.सारिका भिसे तसेच शिवनेरी रिक्षा स्टॅन्ड संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिल शिंदे आणि उपाध्यक्ष श्री.बाबासाहेब हंकारे, पत्रकार श्री.घोरपडे, श्री.राजू शेठ यादव उपस्थित होते.

Post Bottom Ad

#

Pages