😱पुणे जिल्हा परिषदेची बोगस जाहिरात प्रसिद्ध करुन बेरोजगार युवकांची फसवणूक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, June 8, 2020

😱पुणे जिल्हा परिषदेची बोगस जाहिरात प्रसिद्ध करुन बेरोजगार युवकांची फसवणूक..

पुणे जिल्हा परिषदेमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत सनदी लेखापाल या पदासाठी भरती करण्यात येत असल्याबाबतची बोगस जाहिरात प्रसिद्ध करुन, बेरोजगार युवकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता.६) उघडकीस आला आहे. या प्रकाराची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेत, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या समयसुचकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. घुले यांच्या निदर्शनास ही बोगस जाहीरात आल्यानंतर, त्यांनी तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना याबाबतची माहिती दिली.

याआधी २२ एप्रिलला असाच प्रकार उघडकीस आला होता. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ई-ग्रामपंचायतसाठी प्रकल्प भरतीसाठी अर्ज मागविण्यात आल्याबाबतची खोटी जाहीरात त्यावेळी काही सायबर गुन्हेगारांकडुन प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहिरातीच्या माध्यमातून उमेदवारी अर्जाच्या नावाखाली युवकांडुन प्रत्येकी ५०० रुपये उकळले जात असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणीसुद्धा जिल्हा परिषदेच्यावतीने फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

केंद्र सरकारच्या निर्मल भारत अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात एक हजार ४१६ सनदी लेखापालांची भरती करण्यात येत असल्याचे या जाहिरातीत दर्शविण्यात आले आहे. यासाठी अंतिम मुदत १६ जून असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे युवकांना आवाहन..
केंद्र सरकारच्या निर्मल भारत अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात एक हजार ४१६ सनदी लेखापालांची भरती करण्यात येत असल्याचे या जाहिरातीत अधिक माहितीसाठी nbazppune@gmail.com हा मेल देण्यात आलेला आहे. या जाहिरातीचा पुणे जिल्हा परिषदेचा काहीही सबंध नाही. सनदी लेखापालाची कधीही भरती केली जात नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. युवकांनी या बोगस जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहनही प्रसाद यांनी केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages