🎂गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्याहून मुंबईला जात असताना रस्त्यातच पोलीस अधिकाऱ्याचा केला वाढदिवस साजरा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, June 8, 2020

🎂गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्याहून मुंबईला जात असताना रस्त्यातच पोलीस अधिकाऱ्याचा केला वाढदिवस साजरा..

कोरोना महामारीच्या काळात पोलीस हे खऱ्या योध्या प्रमाणे आपल्यासाठी रात्रंदिवस उभे आहेत. मग यात त्यांना सण ना वाढदिवस… मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला वाढदिवसाचं भन्नाट ‘गिफ्ट’ दिलं आहे.

मुंबई महामार्गावर कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुण्याहून मुंबईला जात असताना समजले. हे कळल्यावर ते काही काळ रस्त्यावर थांबले जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेछया दिल्या. एवढंच नव्हे तर त्याहीपुढे जाऊन त्यांनी उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांना आपल्या हाताने केक देखील भरवला.

खुद्द गृहमंत्र्यांने आपला वाढदिवस साजरा करण्याचे ‘गिफ्ट’ श्रीकांत जाधव यांना मिळाले. त्यामुळे साहजिकच ते भारावून गेले होते. गृहमंत्री अनिल देशमुख हे कायमच सर्वसामान्य नागरिकांमध्ये, पोलिसांमध्ये मिसळतात. राज्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन असतानाही देशमुख यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे २४ जिल्ह्यांचा दौरा करुन तेथील पोलिसांचे मनोबल वाढवले. आपल्या दौऱ्यात त्यांनी बंदोबस्त ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली.

Post Bottom Ad

#

Pages