😷दिलासादायक..गेल्या तीन दिवसांपासून पोलीस प्रशासनात एकही नवीन कोरोना रुग्ण नाही.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, June 9, 2020

😷दिलासादायक..गेल्या तीन दिवसांपासून पोलीस प्रशासनात एकही नवीन कोरोना रुग्ण नाही..

महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकरता दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या तीन दिवसांत महाराष्ट्र पोलीस दलात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. तर पोलीस प्रशासन दलातील याआधी कोरोनाबाधित झालेल्या २ हजार ५६२ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत ३४ जणांचा या कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

No new #COVID19 case in Maharashtra Police over the last 24 hours. Total coronavirus cases in the force stand at 2,562, death toll at 34: Maharashtra Police pic.twitter.com/ue69R3zcvJ — ANI (@ANI) June 9, 2020

अनेक पातळ्यांवर पोलीस कोरोना योद्धा..
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासूनच कोरोनाचा लढा देण्याकरता पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेऊन आपले कर्तव्य बजावत होते. लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी, रुग्णालयांबाहेरील बंदोबस्त, कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांच्या जबाबदाऱ्यांसह तपशिलांची नोंदणी, बेवारस मृतदेहांवरील अंत्यसंस्कार, मास्क न लावता बाहेर भटकणाऱ्यांची धडपड, अशी सर्वच जबाबदारी पोलिसांवर आहे. याशिवाय स्थलांतरित मजुरांच्या नोंदणीपासून पाठवणीपर्यंत प्रक्रियाही त्यांच्याकडूनच पूर्ण केली जात आहे, अशाप्रकारे रस्त्यावर उतरुन एक ना अनेक पातळ्यांवर कोरोना योद्धा म्हणून पोलीस प्रशासन जबाबदारी पार पाडत आहेत.

दरम्यान, डॉक्टर, नर्स यांना दिले जाणारे पीपीई किट पोलिसांना दिले जात नसल्याने सुरुवातीला बाधा होण्याचे प्रमाण वाढत होते. मात्र, सध्या हे प्रमाण कमी झाले असून दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून पोलीस प्रशासनात एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.

Post Bottom Ad

#

Pages