😱पुण्यात लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांमध्ये शहरातून 1355 नागरिक गायब.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, June 9, 2020

😱पुण्यात लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांमध्ये शहरातून 1355 नागरिक गायब..

लॉकडाऊन मध्ये पुण्यातून दररोज सरासरी 18 नागरिक गायब होत असल्याची धक्कादायक आकडेवारी पोलिसांनी नोंदवली आहे. अडीच महिन्यांमध्ये शहरातून तब्बल 1355 नागरिक गायब झाले आहेत तर 309 जणांचे अपहरण करण्यात आले. शहरातील बहुतांश पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या अडीच महिन्यात गायब झालेल्या 1355 नागरिकांपैकी 78 नागरिक सापडले आहेत. उर्वरित उर्वरित 1277 झाडांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

त्यामुळे हे नागरिक नेमके गेले कुठे की त्यांचे अपहरण झाले असा सवाल कुटुंबीयांनी केला आहे. अपहरणाच्या तक्रारीही वाढल्या असून 309 अपहृतांपैकी 73 जणांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी कुटुंबीयांनी नोंदवले आहेत.

Post Bottom Ad

#

Pages