😱 पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराच्या रॅलीत स्वागतासाठी गेलेला पोलिस कर्मचारी निलंबित.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, June 1, 2020

😱 पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराच्या रॅलीत स्वागतासाठी गेलेला पोलिस कर्मचारी निलंबित..

पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटका झालेल्या गुन्हेगाराची दुचाकी आणि चारचाकीतून रॅली काढण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी, दरोडा विरोधी पथकातील एक पोलीस कर्मचारी देखील यात सहभागी होता. त्याच्यासह विश्रांतवाडी पोलिसांनी इतरांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची प्रतिमा मलिन केल्या प्रकरणी शरीफ बबन मूलाणी याला निलंबित करण्यात आले आहे. असे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले होते.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला गुन्हेगार शुक्रवारी येरवडा कारागृहात पॅरोलवर सुटला होता. तेव्हा, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी दरोडा विरोधी पथकातील कर्मचारी शरीफ मुलाणी हा त्या ठिकाणी स्वागतासाठी गेला होता. दुचाकी आणि चारचाकीतून कारागृहातून सुटलेल्या आरोपीची रॅली काढण्यात आली होती. तेव्हा, विश्रांतवाडी पोलिसांनी संबंधितांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.

दरम्यान, मुलाणी याची ड्युटी ही भोसरी परिसरात होती. मात्र, प्रत्येक्षात तिथं उपस्थित न राहता येरवडा या ठिकाणी जाऊन गुन्हेगाराच्या रॅलीत सहभाग नोंदवला. दरम्यान, एका मोटारीत एक गावठी पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केलेली आहेत. या प्रकरणी शरीफ मुलाणी याला पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी निलंबित केले आहे. असे आदेश त्यांनी मध्यरात्री दिले होते.

Post Bottom Ad

#

Pages