🚨कोरोनाच्या लढाईत जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावणार्या पोलीसांना ‘आपत्ती सेवा पदक’ देऊन करणार गौरव.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 17, 2020

🚨कोरोनाच्या लढाईत जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावणार्या पोलीसांना ‘आपत्ती सेवा पदक’ देऊन करणार गौरव..

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यात अगदी ग्राम पातळीपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे. त्या सर्व पोलिसांचा ‘आपत्ती सेवा पदक’ देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील पोलीस दल गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच जनमानसात सुरक्षा आणि सामाजिक बांधिलकी रहावी याकरिता अहोरात्र कार्यरत आहेत. तसेच लोकांच्या सुरक्षिततेपर्यंतची सर्व कामे पोलीस करीत आहेत. विशेष म्हणजे लाँकडाऊनमध्ये लोकांना मास्क लावा, असे समजावून सांगण्यापासून ते सामाजिक अंतर राखण्यास प्रवृत्त करण्यापर्यंतची सर्व कामे पोलिसांना करावी लागली. त्याचप्रमाणे परप्रांतीय कामगारांना पाठवण्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांना कार्य करावे लागले.

⏺️ ४२ पोलीस बांधवांना वीरगती..
हे सर्व करत असताना पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना संसर्ग झाला. त्यासही न डगमगता आपल्या पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य सुरूच ठेवले. दुर्दैवाने आपल्या ४२ पोलीस बांधवांना यात वीरगती देखील प्राप्त झाली आहे.

राज्यातील पोलीस बांधवांना सन्मानित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी गृह विभागातर्फे आपत्ती सेवा पदक देऊन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

#

Pages