😱पोलिस दलात खळबळ..एका पोलिस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचारी निलंबित.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 3, 2020

😱पोलिस दलात खळबळ..एका पोलिस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचारी निलंबित..

देवळाली कॅम्पमधील गोळीबार प्रकरणात पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी कामात कसूर केल्याच्या कारणास्तव पाच पोलिस कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले होते. ही घटना ताजी असताना सिन्नरफाटा भागात एका गुन्ह्यात तपासाकामी घरझडतीत कर्तव्यात कसूरी केल्याच्या कारणावरुन नाशिकरोड पोलिस ठाण्यातील एका पोलिस निरीक्षकासह पाचजण निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर डोंबरे व गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी सिन्नरफाटा भागात एका गुन्ह्याच्या तपासाकामी चार दिवसांपुर्वी घरझडतीसाठी गेले असता याठिकाणी कामात कसूर केल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. ही बाब पोलिस आयुक्तांनी गांभीर्‍याने घेतली. त्यानंतर पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त पातळीवर या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस निरिक्षक सुधीर डोंबरे व चार पोलिस कर्मचारी यांना मंगळवार दि.२ रोजी रात्री उशिरा निलंबित केले. त्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Post Bottom Ad

#

Pages